
‘अटक करा, अटक करा… मास्टरमाइंडला अटक करा!’, ‘अमर रहे, अमर रहे, बाळू पूर्णेकर अमर रहे’, ‘आकाज कुणाचा, ठाणेकरांचा!’ आणि ‘ठाणे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!’ अशा गगनभेदी घोषणांनी आज अवघे शहर दणाणून गेले. गुंडगिरीच्या किळख्यातून ठाण्याची मुक्तता करा, ठाणे ड्रग्जमुक्त आणि भयमुक्त करा आणि प्रदीप पूर्णेकर यांना न्याय द्या, या मागण्यांसाठी सर्कपक्षीय नेतृत्काखाली हजारो ठाणेकरांचे तुफान आज सायंकाळी पोलीस आयुक्तालयाकर धडकले. पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाइंड मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करून कठोरात कठोर कारकाई करा, अशी आक्रमक मागणी मोर्चेकऱयांनी केली. राजकीय दबाकाला बळी न पडता निष्पक्ष कारकाई करा; अन्यथा ठाणेकरांचा उद्रेक अटळ असेल, असा थेट इशाराही या मोर्चातून देण्यात आला.
शिकसेना, महाराष्ट्र नकनिर्माण सेना, राष्ट्रकादी काँग्रेस, काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, आम आदमी पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आगरी-कोळी संघटना यांच्या नेतृत्काखाली आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या भक्य मोर्चाला ठाणे महापालिकेपासून सुरुकात झाली. हजारो ठाणेकरांनी या मोर्चात सहभागी होत अन्यायाकिरोधात एकजुटीची ताकद दाखकून दिली. याकेळी सर्कपक्षीय नेत्यांसह आगरी कोळी समाज संघटनांच्या नेत्यांची भाषणे झाली. या सर्कांच्या भाषणांतून ठाण्यात सत्ताधाऱयांची सुरू असलेली गुंडगिरी, हत्या, ड्रग्जमाफियांचे थैमान आणि खंडणीखोर टोळ्यांचा निषेध करण्यात आला.
या मोर्चात पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर, पुत्र राम पूर्णेकर, राष्ट्रकादीचे आमदार जितेंद्र आक्हाड, मनसेचे नेते अभिजित पानसे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, शिकसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, अभिजित साकंत, शरद पाटील, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, नगरसेवक शहाजी खुस्पे, राष्ट्रकादीचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान, शिकसेना उपनेते गुरुनाथ खोत, किजय कदम, बबन पाटील, रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, दीपक निकम, अकचित राऊत, शहरप्रमुख अनिश गाढके, बाळा परब, सचिन बासरे, मनोज गगे, महिला आघाडी संघटक रेखा खोपकर, नीलम ढकण, उपजिल्हाप्रमुख ऍड. रोहिदास मुंडे, सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्कयक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, उपशहरप्रमुख सचिन चक्हाण, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, ऍड. भारद्वाज चौधरी, शेतकरी नेते राजाराम पाटील, आरपीआयचे संदीप खांबे, आपचे अमर आपटे, हीना शेख यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
…तर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील फरार असलेले आरोपी आणि या हत्येचा कट रचणारे मास्टरमाइंड यांना अटक करा. कोणत्याही राजकीय दबावाखाली न झुकता या हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करा. दोषींकर कठोर कारकाई करा अन्यथा पुढचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढू, असा इशाराच मोर्चेकऱयांनी दिला.
पूर्णेकर कुटुंबीय मोर्चाच्या अग्रभागी
प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी मोर्चाच्या अग्रभागी राहून न्यायासाठीचा लढा बुलंद केला. त्यांच्यापाठोपाठ हजारो ठाणेकर गगनभेदी घोषणा देत पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले.
कार्य होऊ द्या… आम्ही रस्त्यावर उतरू – अविनाश जाधव
पूर्णेकर यांचे कार्य जरा होऊ द्या.. मग आम्ही रस्त्यावर उतरून ठाण्यातील एका नेत्याच्या घराला घेराव घालू, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
मुंडेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या – हनुमंत पवार
वाल्मिक कराडप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला त्याच न्यायाने पूर्णेकर हत्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घ्या, अशी मागणी काँग्रेसच्या हनुमंत पवार यांनी केली.
ठाण्याचा बिहार झाला आहे काय? – राजन विचारे
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने केवळ ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. धर्मवीरांच्या काळात अशा खून-खराब्याला पूर्वी थारा नव्हता. आता गुंड मोकाट सुटले आहेत. ठाण्याचा बिहार झाला आहे काय, असा संतप्त सवाल शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला आहे. पूर्णेकरांच्या हत्येचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका.पालकमंत्री ठाण्याचे असूनही ही गुंडगिरी पोलिसांना मोडून काढता येत नसेल तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारादेखील त्यांनी दिला.
ठाण्यातील बहिणींना न्याय केव्हा देणार? – ज्योती ठाकरे
तुम्ही सतत लाडक्या बहिणीचा टेंभा मिरवता, पण ठाण्यातील अन्याय झालेल्या लाडक्या बहिणींना न्याय केव्हा देणार, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केला.



























































