
पुण्यातील ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या दीपाली सय्यद यांनी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख ‘लाडके मुख्यमंत्री’ करताच विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत दीपाली सय्यद यांना बोलूच दिले नाही. दीपाली सय्यद यांनी वारंवार विनंती करूनही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने अखेर त्यांना आंदोलन स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला.


























































