माधुरी-सोनाली एकाच मंचावर; सोमवारपासून ’कोण होणार करोडपती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची सुरुवात येत्या सोमवारपासून होणार आहे. बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असून कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या विशेष भागात सोनाली बेंद्रे हॉटसीटवर विराजमान होणार आहे.पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र दिसणाऱया या दोन लोकप्रिय अभिनेत्रींची जोडी प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. प्रेक्षकांना बॉलिवूडच्या जुन्या आठवणी, खुसखुशीत गप्पा आणि ‘कोण होणार करोडपती’च्या खेळातील उत्कंठा यांचा सुंदर मिलाफ या भागात पाहायला मिळणार आहे. ‘कोण होणार करोडपती’चे एपिसोड सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहेत.