
मणिपूरच्या कामजोंग आणि उखरूल येथे पुन्हा मोठा हिंसाचार उफाळून आला असून सशस्त्र गटांच्या संघर्षात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. दोन्ही गटांनी एकमेकांच्या गावातील काही घरे जाळली तसेच एक पोलीस ठाणेदेखील पेटवून दिले. नागाबहुल कामजोंग येथे कुकीबहुल चसाड गावात 22 वर्षांचा एक तरुण आणि एका 42 वर्षी महिलेच्या हत्येनंतर हा हिंसाचार उफाळून आला. कुकी आणि नागा समुदायातील दोन सशस्त्र गटांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. शनिवारी सकाळपर्यंत हा संघर्ष सुरूच होता. उखरुल, कामजोंग, कांगपोकपी, तामेंगलोंग आणि नोनी या जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला. एकीकडे हा हिंसाचार पेटलेला असताना कामजोंग जिह्यात म्यानमार सीमेजवळच्या निंगचो या नागाबहुल गावात बंडखोरांनी भीषण गोळीबार केला.























































