
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास व आशुतोष रांका यांची सुमारे 24 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलेल्या या तिघांना रविवारी दिल्ली कँट येथील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली. अटी-शर्तींसह 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी दिल्लीत विमान उतरल्यानंतर पोलिसांनी विमानातून अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. दीपके यांच्या अनुपस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे यांनी केले.
रविवारी सकाळी सीजेपीच्या तीनही नेत्यांना विशेष न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. आता तीनही नेते बाहेर आल्याने रविवारीही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार सीजेपीचे नेते अंजिक्य शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला होता.
#WATCH | Delhi: CJP leader Abhijeet Dipke, Ashutosh Ranka, and Saurav Das produced before the Executive Magistrate at Delhi Cantt Police Station after preventive arrest. https://t.co/wL1nt52zJA
— ANI (@ANI) October 11, 2026
दरम्यान, अभिजित दीपके यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अभिजित यांच्या आई अनीता दीपके यांनी पोलिसांवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला. अभिजित यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. अभिजित यांच्या वडिलांनीही त्यांना दिल्लीबाहेर हलवण्यात आल्याचे सांगितले. आजीच्या निधनाची माहिती वेळेत मिळाली असती, तर अभिजित तातडीने घरी पोहोचला असता, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.
#WATCH | Hingoli, Maharashtra: Abhijeet Dipke’s mother, Anita Dipke, says, “We have not been able to contact him…Delhi Police is lying. If he got the news (his grandmother’s demise), he would have come immediately…we have put the last rites on hold for him…” https://t.co/ncCp7cWxGF
— ANI (@ANI) October 11, 2026
























































