कान्हा व्याघ्र प्रकल्पात शंभर वर्षांनंतर रानगव्यांचे पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या सूपखार परिक्षेत्रात तब्बल शंभर वर्षांनंतर रानगव्यांचे पुनरागमन झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून आणलेल्या आठ रानगव्यांना 17 हेक्टरच्या विशेष अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. हे सर्व रानगवे यापूर्वी लहान अधिवासात विलगीकरणात ठेवण्यात आले होते, जेणेकरून त्यांना तिथल्या हवामानाची आणि परिसराची सवय होऊ शकेल. आसाममधून आणलेल्या या गव्यांमध्ये सहा मादी आणि दोन नरांचा समावेश आहे. तब्बल 2 हजार 200 किलोमीटरचा प्रवास करून त्यांना कान्हा व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने आगामी तीन वर्षांत कान्हा परिसरात एकूण 50 रानगवे पुनर्वसित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.