
‘मतचोरीविरुद्ध आंदोलन करणाऱया तरुणांचा आवाज पोलिसांच्या बळावर दाबता येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या वेळीही सरकारला ते जमले नाही. आताही जमणार नाही, असे सांगतानाच, ‘नरेंद्र मोदी हे लवकरच माजी पंतप्रधान होतील,’ असा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज केला.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या आंदोलनांवर परखड मते मांडली. ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद असल्याचे सांगितले जाते. मग उपराष्ट्रपती पदाचे काय? ते राजीनामा देऊ शकतात तर निवडणूक आयुक्त का देऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा पर्याय त्यांनी फेटाळून लावला. हे पाऊल उचलणे खूप घाईचे होईल, असे ते म्हणाले.































































