चरस, गांजा, एमडीचा मोठा साठा जप्त मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पक्षाने शहरात तीन वेगवेगळय़ा ठिकाणी धडक कारवाया केल्या. सवा कोटीचा चरस, 10 लाखांचा एमडी आणि 11 लाखांचा गांजाचा साठा पोलिसांनी नशेबाजापर्यंत पोहचण्याआधीच पकडला. या कारवायांमध्ये चौघा तस्करांना पकडण्यात आले.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने मिळालेल्या माहितीच्या आधारे जोगेश्वरी बस डेपो परिसरात मोहम्मद कासिम शेख (22) या तरुणाला उचलले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 1113 ग्रॅम वजनाचा चरस मिळून आला. एक कोटी 11 लाख 30 हजार इतकी आहे. तर आझाद मैदान युनिटने चेंबूर येथे दोघा ड्रग पेडलर्सना पकडले. त्यातील एकाकडे 117.58 ग्रॅम तर दुसऱयाकडे 213.91 ग्रॅम वजनाचा एमडी सापडला. दोघांजवळ मिळालेल्या एमडीची किंमत 10 लाख 13 हजार इतकी आहे. दरम्यान, घाटकोपर युनिटने लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाबाहेर मनीष कुमार चौधरी (25) या तरुणाला पकडले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ 11 लाख 48 हजार किमतीचा दोन किलो वजनाचा गांजा मिळून आला.