ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा बॉम्ब फुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे देशात दिवाळीच्या आसपास नोव्हेंबर महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली जाऊ शकते. पुढील वर्षी सुरुवातीलाच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

इंधन दरवाढीशिवाय पर्याय नाही. मात्र, उत्तर प्रदेश, पंजाबसह सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात दरवाढ करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे, असे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या प्रमुख अर्थतज्ञ एलेक्झांड्रा प्रसाद यांनी म्हटले आहे.