ट्रेंड – छोटीशी महिषासुरमर्दिनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सगळीकडे नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. नवरात्र म्हटलं की, जगदंबा देवी वाईट शक्तींचा नाश करणारी आणि आपल्या भक्तांचे संरक्षण करणारी. देवी आईकडून प्रेरणा घेत लहानगी एका बाहुल्याला पायदळी तुडवत त्याचा संहार करताना दिसतेय. तिच्यावर पॅमेरा आल्यावर तिने जीभ काढून मस्त पोझही दिली. हा व्हिडीओ @sharvi1223  या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 67 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर ‘असे तेजस्वी लोक कुठून येतात?’, ‘लय भारी बाळा’, ‘जय माता दी’ अशा कमेंट्स येत आहेत.