Ratnagiri News – समान काम समान वेतन मिळण्यासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व  सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “समान काम समान वेतन” मिळण्यासाठी धरणे आंदोलन छेडले. समान काम समान वेतन या तत्त्वाप्रमाणे महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळण्यासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. आमची न्याय मागणी लवकरात लवकर मंजुर करावी या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. समान काम समान वेतन या धोरणानुसार दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी
कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष विजय चव्हाण ,माजी रत्नागिरी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष आर व्ही पाटील, चंद्रशेखर भागवत, ए. ए. कोठावळे,ए. व्ही खानविलकर,राजन शिंदे, संजय सनगरे,चंद्रशेखर पाटील,विरेंद्र गडवी,राजेश ना. सुवरे,अविद्र शिंदे ,आसिफ मुन्शी,विजय जोशी,सुनिल पवार , मांडवकर,राजन साळवी, नेहा पाटील,संध्या जोशी,संजय पोवार, पाटणकर, के. के. गानू, एम एस भावे धुळप,सुरुची सावंत, एस व्ही पुरोहित , ए. ए. नलावडे ,एस. पी. जाधव,बंटी शिवलकर,पी. जी. टाकळे,नितीन जी. नार्वेकर, समीक्षा मुळ्ये,अनिल सावर्डेकर,व्ही. एस. कावतकर, नेहा कजबजे,रवी कदम,के. डी. चव्हाण,पी. डी. सातोपे,उत्तम नलावडे अन्य जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.