
गूगल मॅप्सच्या मदतीने रस्ता शोधणे एका टेक्निशियनच्या गटाला चांगलेच महागात पडले आहे. गूगल मॅप्समुळे घरी पोहचण्याऐवजी 9 जणांचा ग्रुप थेट घनदाट जंगलात पोहचला. रस्ता चुकल्याने रात्रभर जंगलात रहावे लागले. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात ही घटना घडली.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वजण नवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हैसूरला गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण चेन्नईला परतत होते. गुगल मॅप्सने दाखवलेल्या मार्गानुसार जात असताना रस्ता चुकले आणि जंगलात पोहचले. रात्रभर त्यांना जंगलात रहावे लागले. त्यानंतर सकाळी पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत सर्वांची सुटका केली.

























































