अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन मंजूर; काय आहेत अटी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्लीतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी ‘तिरंगा मार्च’ काढण्यापूर्वी त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

आज दीपके यांना न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना अटींसह जामीन दिला. न्यायालयाने दीपके यांना पीस बाँड (शांतता राखण्याचे हमीपत्र) भरण्याचे निर्देश दिले आहेत. हमीपत्र भरण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची लवकरच सुटका केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येणार नाही.

दरम्यान, शुक्रवारी अटकेच्या कारवाईमुळे हिंदुस्थानातील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू होती. मात्र आता न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे दीपके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.