Bangladesh Fire – बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू, 10 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशात एका रिसॉर्टला शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत किमान 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कॉक्स बाजारमधील इनानी येथील मरीन ड्राइव्हजवळील पटुअरटेक बीचजवळ असलेल्या ‘तुपतुप रेस्टो अँड रिसॉर्ट’मध्ये शनिवारी सकाळी 6.30 वाजता आग लागली. स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार, रिसॉर्टमध्ये 30 लोक होते. त्यापैकी 4 ते 5 जण बाहेर पडण्यात यशस्वी झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

जखमींपैकी एकाला उपचारानंतर सोडून देण्यात आले असून, नऊ जखमींना कॉक्स बाजार सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यापूर्वी डीएनए नमुने घेतले जातील. अग्निशमन दल आगीच्या कारणांचा तपास करत आहे.