
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत वैयक्तिक सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे. दुपारी 4 वाजता महानगरपालिका कार्यालयाबाहेरील फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यापासून ते पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. हातात तिरंगा आणि भारतीय संविधान घेऊन ही पदयात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके आणि AISA विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष नेहा बोरा यांनी दिल्लीत तिरंगा मार्च काढणार होते, पण पोलिसांनी दीपके आणि बोरा यांच्यासह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले होते. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी मुंबईत सत्याग्रह करणार आहेत.
ही पदयात्रा हुतात्मा चौकातून पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला भेट देत ही पदयात्रा मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी संपेल.
“मी हातात तिरंगा आणि आपले संविधान घेऊन चालणार आहे. हा माझा वैयक्तिक सत्याग्रह असेल,” असे तुषार गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
On 1st November at 4:00 pm. I will start walking from the statue of Ferzosha Mehta outside Mahanagar Palika. I will go via Hutatma Chowk to the Statue of Babasaheb Ambedkar and then onwards to the statue of Pandit Nehru and finally end at the statue of Bapu next to Mantralaya I will walk with the Tiranga and Our Constitution in my hands. This will be my individual Satyagraha. #Civil_Disobediance #Satyagraha
— Tushar Gandhi (@TusharG) October 17, 2026

























































