
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर आणि पनवेल व वाशी स्थानकांदरम्यान हार्बर आणि ट्रान्स-हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप दिशेकडील मेल/एक्सप्रेस गाड्या अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील. यामुळे या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
‘या’ गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील
- गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल
- गाडी क्रमांक 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 11014 कोयंबटूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 17611 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
ब्लॉक कालावधीत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान खालील डाउन दिशेकडील मेल/एक्सप्रेस गाड्या डाउन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा चालतील.
‘या’ गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील
- गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर गोदान एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
ब्लॉक कालावधीत वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 61003 वसई रोड – दिवा मेमू गाडी कोपर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. दिवा येथून सकाळी 11.30 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 61004 दिवा – वसई रोड मेमू गाडी कोपर स्थानकावरून सकाळी 11.45 वाजता सुटेल. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान ही मेमू सेवा रद्द राहील.
हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाऊन हार्बर लाईनवर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी दरम्यान विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट लाईनवरील सेवा सुरू राहतील.



























































