उघड्या डोळ्यांनी सरकार पाहतेय मृत्यूचे तांडव; जिंतूर तालुक्यात 8 महिन्यात 19 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, दुष्काळी मदतीची घोषणा हवेतच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

>> मंचक जगताप

जिंतूर तालुक्यातील निसर्गाचा तुघलकी कोप, नापिकीची कुन्हाड आणि डोक्यावर कर्जाचा अजख डोंगर या भीषण दुष्टचक्रात सापडून उ‌द्ध्वस्त झालेला बळीराजा आज पूर्णपणे कोलमडून पडला आहे. महाराष्ट्र ज्या अन्नदात्याच्या घामावर जगतो, तोच अन्नदाता माज जिंतूरच्या मातीत उपड्या डोळ्यांनी आपल्या आयुष्याची अखेर करताना दिसत आहे. जानेवारी ते २० ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत जिंतूर तालुक्यातील तब्बल १९ बळीराजांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक अन् काळजाचा ठोका चुकवणारी माहिती समोर आली आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या या शेतकरी आत्महत्यांमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून, गेंड्याच्या कातडीचे सरकार आणि लाचार प्रशासकीय यंत्रणा मात्र केवळ कागदी सोपस्कारांमध्ये मग्न असल्याचे संतापजनक चित्र आहे.

तरुणांपासून वृद्धांपर्यंत…. स्मशानात रुपांतरित झालेली गावे

तालुक्यातील करवली, वरूड, गणपुर, कोक, सावरगाव, भोगाव देवी, रेपा असो की, सावरगाव अन् पोखरणी तांडा… गावोगावी काज केवळ सत्राटा आणि अश्रूचा पूर पाहायला मिळत आहे. २० वर्षांच्या नवतरुणापासून ते ६८ वर्षांच्या थकलेल्या वृद्धांपर्यंत, प्रत्येक वयोगटातील शेतकऱ्याने हतबल होऊन कधी विषारी औषध प्राशन केले, कधी विहिरीत उडी घेतली, तर कधी गळफास घेऊन आपला जीव टांगला. अन्नदात्याची ही दैन्यावस्था पाहून नातेवाईकांचा हंबरडा काळीज चिरणारा आहे. एका बाजूला कुटुंबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत, तर दुसऱ्या बाजूला ‘लाडकी बहीण’ योजनांचे ढोल वाजवणाऱ्या सरकारला या ‘लाडक्या भावांचा’ टाहो मात्र ऐकू येत नाहीये, हीच खरो शोकांतिका आहे.

लालफितीचा कारभार अन् सरकारची क्रूर चेष्टा

शेतकऱ्यांच्या बलिदानावरही सरकारकडून लालफितीचा वरवंटा फिरवला जात आहे. १९ आत्महत्यांपैकी बहुतांश प्रकरणे अजूनही प्रशासकीय लालफितीत ‘प्रलंबित’ ठेवून पीडित कुटुंबांची क्रूर चेष्टा सुरू आहे. वेळेवर तुटपुंजी मदतही न मिळाल्याने अनाथ झालेली कुटुंबे हवालदिल झाली आहेत, मदत नाकारण्यासाठी भलतीच तांत्रिक कारणे पुढे करत प्रशासनाकडून मृत शेतकऱ्याच्या अर्जावर थेट ‘अपात्र’ असा शेरा मारला जात आहे. पोखरणी तांडा येथील विठ्ठल देवराव चव्हाण या तरुणाने बंजारा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विषारी औषध प्राशन करून आपले आयुष्य संपवले. हा केवळ मृत्यू नसून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी आहे. शासनाने केवळ बैठकांचे अणि आश्वासनांचे खेळ न खेळता, संकटात सापडलेल्या जिंतूरच्या बळीराजाला तात्काळ ठोस मदत जाहीर करावी अन्यथा जनतेचा हा उद्रेक रस्त्यावर उतरेल आणि सरकारला पळता भुई थोडी करेल.

जनता विचारतेय जाब

शेतकऱ्यांच्या पाठीवर मदतीचा हात ठेवण्याऐवजी फक्त घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारला आता जिंतूरचा शेतकरी माफ करणार नाही. वेळेत पंचनामे करा, तात्काळ संपूर्ण कर्जमुक्ती द्या आणि पीडित कुटुंबांना प्रशासकीय जाच न लावता त्वरित आर्थिक मटत सुपूर्द करा, अन्यथा या अन्यायाविरुद्ध पेटलेला वणवा संपूर्ण राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही.

१२ कुटुंबांची प्रतीक्षा कायम

शासनाच्या मदतीसाठी तालुक्यातील १९ प्रकरणांपैकी लात प्रकरणे पात्र ठरली आहेत. त्यातील काही कुटुंबांना आर्थिक मदत मिळाल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरित १२ प्रकरणांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. संकटाने आधीच खचलेल्या कुटुंबांना शासकीय मदतीसाठीही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केलेली नाहीत. त्यामुळे जिंतूर तालुक्यात ८ संपवली जीवनयात्रा संबंधित प्रस्तावांची प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगितले जाते. अशा कुटुंबांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करून प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

दुष्काळाची चाहूल; शेतकऱ्यांच्या मनात उद्याची चिंता

पावसातील खंड, पिकांच्या उत्पादनाबाबतची आनिश्चितता आणि शेतीसाठी केलेल्या खर्चाची परतफेड होण्याची चिंता यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन, पीक नुकसानीबाबत योग्य मदत आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आधार मिळणे आवश्यक आहे.

कमलाकर जगताप, शेतकरी, पुंगळा, ता. जिंतूर