
एक लहान मुलगा त्याच्या दीदीबरोबर कन्या पूजनाला जाण्याचा हट्ट करत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या बाबांकडे ‘कन्या पूजनाला जायचेय मला कपडे घाला’ असे सांगत आहे. त्याचे बाबा त्याची समजून घालत आहेत की, ‘तू काय मुलगी आहेस का?’ तरीही तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे. कन्या पूजनच्या कार्यक्रमात मुलींना मिळत असलेल्या भेटवस्तूंमुळे हा चिमुरडाही तिथे जाण्याचा धोशा लावत आहे. नवरात्रीच्या काळात @sharvilmisal30 या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे. नेटिझन्सनी या व्हिडीओवर अनेक विनोदी कमेंट्स केल्या आहेत. ‘निषेध करा. पुत्र पूजन का नाही’ असा एकाने प्रश्न विचारलाय, तर एका युजरने ‘कन्यांसोबत भैरव पूजन पण करतात, जाऊ द्या त्याला’ अशी पाठराखण केली आहे.


























































