एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला पक्षी धडकला; बंगळुरू विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाखापट्टणहून बेंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला पक्षी धडकला. त्यानंतर बंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानात असलेले सर्व प्रवासी सुखरूप आहेत. विमान उतरल्यानंतर ते पार्किंग स्टँडवर नेण्यात आले. सुरक्षेच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार, ग्राउंड इंजिनिअर्स आणि तांत्रिक पथकांनी विमानाची तपासणी केली

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सोमवारी विशाखापट्टणमहून बंगळुरूकडे चालले होते. विमानात 148 प्रवासी होते. प्रवासादरम्यान विमानाला पक्षी धडकला. मात्र वैमानिकाने बंगळुरू विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. विमान विमानतळावर उतरताच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यानंतर विमान तपासणीसाठी पार्किंग बे कडे नेण्यात आले.