
देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असून धमकीचा मेल सीआरपीएफकडे आला आहे. मुंबई सीआरपीएफकडे हा मेल आल्याची माहिती आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला सीआरपीफच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसेच यासंदर्भात तपास यंत्रणांना तात्काळ माहिती दिली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई सीआरपीएफला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात धमक्यांचा मेल आला आहे. संबंधित तपास यंत्रणांना याची माहिती कळविण्यात आली आहे, अशी माहिती सीआरपीएफच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
A threat mail was received by CRPF in Mumbai a few days ago naming Union Home Minister Amit Shah and UP CM Yogi Adityanath, concerned agencies have been informed: CRPF sources
— ANI (@ANI) April 6, 2021




























































