आमीर खान म्हणतो, कोण वांगचुक, काय माहीत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमीर खान याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘3 इडियट्स’ चित्रपटातील फुंसुख वांगडू हे पात्र सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र, आमीर खान याने ही बाब फेटाळली आहे. कोण वांगचुक, काय माहीत… हा चित्रपट तयार होत होता, त्यावेळी मी वांगचुक यांना ओळखतदेखील नव्हतो, असे आमीर म्हणाला. आमीर खान याने लंडन येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका प्रश्नाला हे उत्तर दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एका महिलेने विचारलेल्या प्रश्नावर आमीर खानने उत्तर दिले की, मला सोनम वांगचुक यांच्या तब्ब्येतीची काळजी आहे. ते लवकरच उपोषण सोडतील, अशी मला अपेक्षा आहे. मात्र, ‘3 इडियट्स’ हा चित्रपट सोनम वांगचुक यांच्यावर बनवण्यात आलेला नाही. चित्रपटाचे काम सुरू होते त्यावेळी मी त्यांना ओळखतदेखील नव्हतो. चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि लेखक अभिजात जोशी हेदेखील त्यांना ओळखत नव्हते. मात्र, सोनम वांगचुक हे सध्या जे काही करत आहेत, ते चांगले कार्य आहे. आदर व्यक्त करण्यासाठी ते ‘3 इडियट्स’चे पात्र असण्याची गरज नाही.

सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे कठीण, मनोज झा यांचा चाबूक