सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे कठीण, मनोज झा यांचा चाबूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘3 इडियट्स’ चित्रपटातील फुंसुख वांगडू हे प्रसिद्ध पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे अभिनेता आमीर खान याने स्पष्ट केल्यानंतर त्याच्यावर विविध स्तरांवरून टीकेची झोड उठली आहे. हे सांगायला आमीर खानला एवढी वर्षे का लागली? सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे सर्वांसाठी सोपे नाही, अशा शब्दांत राजदचे राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी आमीर खानवर कडाडून टीका केली.

आमीर खानच्या स्पष्टीकरणाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मनोज झा म्हणाले की, हे त्याला आत्ताच का आठवले? हे सांगायला त्याला एवढी वर्षे का लागली? आतापर्यंत प्रत्येकजण हेच समजत होता की, ‘3 इडियट्स’मधील आमीरचे पात्र सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित आहे. असे असताना आमीरच्या भूमिकेमुळे सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे सोपे नाही. वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, अशा सरकारसमोर उपोषण करण्यात काहीही अर्थ नाही, असे झा म्हणाले. तर आमीरने निर्भिडपणे कसे बोलावे, हे नसीरुद्दीन शाह यांच्याकडून शिकावे, असा सल्ला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी दिला.