
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यावे अशी माझ्या भावाची इच्छा होती, पण आता तशी भावना त्या बाजूने येत नसल्यामुळे आम्ही दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम दिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. मागील दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून नेत्यांच्या गाठीभेटीवरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही विलीनीकरणाच्या चर्चावरून आम्ही स्वाभिमानी आहोत
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चावर आमचे काही नेते सुरुवातीलाच बोलले होते; पण समोरच्यांनी सांगितलं की, असं काही झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला खूप दुःख आणि वेदना झाल्या. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. आता आम्ही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यू-टर्न घेतला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आज माझा भाऊ राहिला नाही. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना आम्ही पूर्णविराम दिला आहे. अजितदादा जाऊन जवळपास पाच महिने झाले. आम्ही आता कुठे कुटुंब म्हणून सावरतोय. माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की, दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राज्याची आणि देशाची सेवा करावी. माझ्या भावाची इच्छा पूर्ण करण्याची माझी इच्छा दादा असतानाही होती आणि दादा गेल्यानंतरही होती; मात्र आता तशी भावना त्या बाजूने येत नाही. त्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या पक्षात त्या विषयाबाबत आम्ही पूर्णविराम दिला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.




























































