
क्यूब हायवेज आयपीओ क्यूब हायवेज फंड
अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे क्यूब हायवेज ट्रस्टने आयपीओसाठी किंमत जाहीर केली. या ऑफरसाठी प्राइस बँड युनिट १५१ ते १५२ रुपये निश्चित करण्यात आले. ही बोली २४ जुलै २०२६ला बंद होईल.
एडलवाईस लाईफ दी एडलवाईस लाईफ फ्लेक्सी ड्रीम प्लॅन पार्टिसिपेटिंग सेव्हिंग्ज लाईफ इन्शुरन्स आहे. संरक्षण, संपत्ती-निर्मितीची संधी एकत्रितपणे देण्यासाठी तयार करण्यात आला. ग्राहकांना दीर्घकालीन आर्थिक ध्येयांच्या दिशेने काम करण्यास मदत करेल.
अॅल्युमिनियम भारत अॅल्युमिनियम एक्सदूजन
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अलेमाई) देशातील मूल्यवर्धित अॅल्युमिनियम मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी अॅल्युमिनियम भारत-२०२६ या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली.
कायदेशीर पडताळणी गुंतवणुकीपूर्वी कायदेशीर पडताळणी आवश्यक, असा सल्ला युनिव्हर्सल लिगल फर्मचे संस्थापक अॅड. अपूर्व अग्रवाल यांनी दिला. रिअल इस्टेट स्टडी सर्कल आणि युनिव्हर्सल लिगल फर्मच्या आयोजित रिअल इस्टेट स्टडी सर्कल नॉलेज सिरीजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँकची नोटा छापणारी उपकंपनी असलेल्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड’ने प्रक्रिया सुरू केली आहे. जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट उत्पादक शोधण्यासाठी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची निवड केली जाण्यासाठी जागतिक निविदा रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात आधी कमी मूल्याच्या नोटांवर याची चाचणी करेल. म्हणजेच पहिल्या प्रोजेक्टमध्ये १० रुपये आणि २० रुपयांच्या छोट्या नोटांचा समावेश असेल.
अदिराकडून कॅमवेअर’ रेंज बाजारात लाँच!
अदिरा कंपनीने खास महिलांसाठी ‘कॅमवेअर’ उत्पादनाची घोषणा केली आहे. महिलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन कॅमवेअर कपड्यांची रेंज सुरू करण्यात आली आहे. हे कपडे सर्व वयोगटातील आणि वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या महिलांच्या गरजा लक्षात घेत तयार करण्यात आले आहेत. ‘कॅमवेअर’ या कपड्यांच्या उत्पादनात टैंक टॉप आणि शॉर्ट्स लाऊंज सेट उपलब्ध असतील. या कपड्यांच्या रेंजमध्ये रुंद खांद्यांचा टैंक टॉप, गुळगुळीत नेकलाईन आणि आर्महोल डिझाईनचा समावेश आहे. तसेच मिड-राईज शॉर्ट्स, संपूर्ण हिप कव्हरेज आणि कपड्यांच्या दोन्ही बाजूंना खिसेही देण्यात आले आहेत. या रेंजचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे कपडे रोज, लॅव्हेंडर आणि ब्रूट या तीन खास सुगंधांमध्ये उपलब्ध आहेत.
एनएसईची ऑग्मोंटसोबत भागीदारी
इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स इकोसिस्टमच्या विकासासाठी राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजने ऑगमॉन्ट एंटरप्रायझेससोबत भागीदारी केली आहे. या वेळी अग्मोंट एंटरप्रायझेसचे संचालक केतन कोठारी, एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन उपस्थित होते. ईजीआरएस जे एनएसईने या वर्षी ४ मे रोजी लाँच केले होते. त्याअंतर्गत भौतिक सुवर्ण एक्सचेंज-व्यापारी डिमॅट सिक्युरिटीजमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.
मेकमायट्रीपकडून वनसर्कल लाँच
मेकमायट्रीपने वनसर्कल या जागतिक रिवॉर्ड्स प्रोग्रामच्या लाँचची घोषणा केली. हा प्रोग्राम खास करून भारतातील पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. याद्वारे जगभरातील १,००२ शहरांमधील हॉटेल्स अँड अल्टरनेट अकोमोडेशन्ससह एकूण १३,३७६ निवास प्रॉपर्टीजचे सहयोगी नेटवर्क एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले आहे. वनसर्कल प्रोग्राम अत्यंत मोठ्या प्रमाणावर लाँच केला जात आहे.
जागतिक बाजारातून मिळविला जाणार आहे. मुख्यत्वे ‘ओपॅसिफाईड पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स’ अर्थात पारदर्शक पॉलिमर कागदाची पाने पुरवण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. बोली लावणारे देशांतर्गत किंवा जागतिक कोणीही असू शकतील. तसेच त्यांचे तंत्रज्ञान सहयोगी, संयुक्त उपक्रम भागीदार किंवा उपकंपन्या देशी किंवा आंतरराष्ट्रीय असू शकतील. मात्र पात्र ठरण्यासाठी त्यांच्याकडे किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ इंडियाच्या इमर्जिंग कॉर्पोरेट क्रेडिट शाखेचे उद्घाटन
बैंक ऑफ इंडियाच्या मुंबईत उत्तर अंचलांतर्गत नव्या स्थापन करण्यात आलेल्या इमर्जिंग कॉर्पोरेट क्रेडिट शाखेचे उद्घाटन मुंबईतील फील्ड जरनल मॅनेजर सुनील शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाव्यवस्थापक विनायक शुक्ला, अमित रंजन सिंह यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोटक म्युच्युअल फंडची कामगिरी
कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने त्यांच्या देशव्यापी रक्तदान उपक्रमाला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता मिळाल्याचे जाहीर केले. एका दिवसात संस्थेकडून सर्वाधिक रक्त युनिट्स संकलित करण्याचा विक्रम त्यांनी केला असून कंपनीने ११४ दान केंद्रांमधून यशस्वीपणे ३,४७१ रक्त युनिट्स गोळा केले. हा उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या रक्तदान मोहिमांपैकी एक ठरला आहे.



























































