
तिरंगा फडकवून आंदोलन करणे या हुकूमशाही सरकारला मान्य नाही. त्यांना वाटते, हा संपूर्ण देश त्यांची खासगी मालमत्ता आहे, पण तसे नाही. जंतर मंतर हे या देशातील 140 कोटी जनतेचे आहे. आम्ही तेथे जाणार आणि ज्ञानेश पुमार राजीनामा देत नाही तोपर्यंत असेच लढत राहणार, असे सीजेपी नेते अभिजित दीपके यांनी मोदी सरकारला ठणकावले.
जंतर मंतरवर तिरंगा फडकवून घोषणाबाजी करणाऱ्या सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. यावरून अभिजित दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जंतर मंतरवर तिरंगा फडकविणे गुन्हा आहे काय? तिरंगा फडकविणे हा कधीपासून कायद्याचा भंग झाला? ज्यांना पुणाला वाटते हा गुन्हा आहे ते देशद्रोही आहेत. त्यामुळे तिरंगा फडकविणाऱ्यांना अटक करणाऱ्यांवर कारवाई करा, असे दीपके म्हणाले.
सरकार सार्वजनिक ठिकाणांना आपली खासगी मालमत्ता समजत आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आमचे कायदेशीर अधिकार नाकारल्यास संपूर्ण देश जंतर मंतर होईल. जंतर मंतर एक ठिकाण नाही, तर प्रतिकाराची भावना आहे, असे अभिजित दीपके म्हणाले.




























































