विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या कॉलेजांविरोधात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणूक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी सरकारकडे तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत. याची गंभीर नोंद समाजकल्याण विभागाने घेतली आहे. समाजकल्याण आयुक्तांनी दिलेल्या आदेशांचे पालन न झाल्यास संबंधित महाविद्यालयांवर तत्काळ कारवाई करावी असे विद्यापीठांना 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण समाधान इंगळे यांनी दिली आहे.