
बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्गावर एक अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 5 जण हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुत याचे नातेवाईक होते.
सुशांत सिंह राजपुतचे भाऊजी ओमप्रकाश सिंह यांच्या बहीणीचे निधन झाले होते. त्यांचे अंत्यसंस्कार आटोपून सुमो कारमधून कुटुंबातील 10 सदस्य घरी परतत होते. तेव्हा लखीसराय जिल्ह्यातील सिकंदरा शेखपुरा राष्ट्रीय महामार्ग 333 वर एका ट्रकवर ही सुमो कार आदळली. या अपघातात कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यापैकी लाजजित सिंह राजपुत हे सुशांत सिंह राजपुतचे भाऊजीचे भाऊजी होते. लाजजित सिंह यांचा मोठा मुलगा अमित, छोटा मुलगा रामचंद्र सिंह, मुलगी बेवी देवी, भाची अनिता देवी आणि चालक प्रीतम कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































