
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून त्यामध्ये बदल करण्यात येत आहे. केंद्र सरकारने AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे आणि त्यांना तात्काळ CRPF च्या Z श्रेणी सुरक्षा प्रदान केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या आधारे माहिती प्रसिद्ध केली आहे.
As per reliable sources, the Government of India has reviewed the security of AIMIM MP Asaduddin Owaisi and provided him with Z category security of CRPF with immediate effect.
(file photo) pic.twitter.com/J0fmwSn0HR
— ANI (@ANI) February 4, 2022
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या गाडीवर चार राउंड फायर झाल्याचा दावा केला होता. या हल्ल्यात त्यांना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरूप आहेत. मात्र या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. AIMIM च्या खासदारांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती.




























































