
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन घोषणा करत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समाजवादी पक्षही जोमाने प्रचार करीत आहे. गाझियाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी दहा रुपयांत समाजवादी थाळी देण्याची घोषणा केली आहे. गाझियाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेश राज्यात आपले सरकार आल्यानंतर 10 रुपयांत समाजवादी थाळी देणार आहोत.



























































