कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसणार नवनगर औद्योगिक वसाहत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

मुंबई शहराची वाढती लोकसंख्या व जागेची कमतरता या दृष्टीने मुंबईचा ताण आता रायगड जिल्ह्यावर टाकण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या किनारी 19 हजार 146 हेक्टर क्षेत्रा ‘नवनगर’ एकात्मिक औद्योगिक वसाहत विकसित करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात 19 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून विकास प्राधिकरण म्हणून सिडकोकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सिडको आता या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करुन राज्यशासनाला सादर करणार आहे.

जिल्ह्यातील रोहा, मुरुड आणि अलिबाग तालुक्यातून वाहणार्‍या कुंडलिका नदीच्या किनार्‍यावर ही औद्योगिक वसाहत बसणार आहे. तर श्रीवर्धन तालुक्यातील वारळ गावाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या चार तालुक्यांमधील 40 गावांमधील 19 हजार 146 हेक्टर क्षेत्रावर हे नवनगर एकात्मिक औद्योगिक वसाहत बसविण्याचे प्रस्तावित आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांची राज्य शासनाने 5 जानेवारीच्या पत्रान्वये प्राधिकरण म्हणून नियुक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई, नैनानंतर आता ‘नवनगर’ औद्योगिक वसाहतीची यामध्ये भर पडणार आहे. विरळ लोकसंख्या असलेल्या खाडी क्षेत्रातील ही जमीन सुपिक म्हणून ओळखली जाते. मासेमारी आणि शेती हा मुख्य व्यवसाय असणार्‍या हा परिसर आतापर्यंत प्रदुषणापासून मुक्त होता.

मुंबई विकासाच्या दृष्टीने रायगड मध्ये औद्यगिक विकास करण्याचा प्रयत्न याआधी नैना प्रकल्प माध्यमातून केला होता. मात्र हा प्रकल्प नंतर बासनात गुंडाळण्यात आला होता. रोहा तालुक्यातील खोपे ते धनगड वाडी, अलिबागमधील भोंनग ते तळवली, मुरुडमधील तळेखार ते आमली व श्रीवर्धन मधील वारळ येथील गावातील जमिनी या प्रकल्पासाठी जाणार आहेत.

त्यामुळे तिसरी मुंबई ही पूर्वी पेण पर्यंत होणार होती. ती आता रोहा, अलिबाग, मुरुड या परिसरात येणार असल्याने येथील जमिनीचा भाव गगनाला भिडले आहेत. मात्र या प्रकल्पाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना कोणतीच कल्पना नसल्याचे बोलले जात आहे.

धेरंड येथील टाटा-पॉवर, आरसीएफ, विळे-भागाड, महाड, धाटाव, पाताळगंगा, खोपोली येथे हजारो एकर जमीन औद्योगिक कारणासाठी शासनाने ताब्यात घेवून पडिक आहे. राज्य शासनाला नवीन प्रकल्प राबवायचा असेल तर त्यांनी या घेतलेल्या जमीनीवर राबवावा. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता हे प्रकल्प आणले जात आहेत.

योजनेमध्ये समाविष्ट असलेली गावे आणि क्षेत्र हेक्टरमध्ये

रोहा तालुका

खोपे 176.68

सारसोली 520.54

तळवडे 209.81

खैराळे 200.30

खारखर्डी 270.81

महाळुंगे 339.12

नवखार 57.02

दीव 279.36

दापोली 269.36

धोंडखार 56.98

शेडसई 413.99

न्हावे 517.75

शिळोशी 1258.29

सोनखार 97.40

कोकबन 255.69

खुटल 82.03

चांडगाव 227.85

करंजविरा 7.64

आंबिवली 475.58

धगडवाडी 956.38

अलिबाग तालुका

भोनंग 380.73

रामराज 834.17

सुडकोली 661.87

कुदे 419.99

ताजपूर 76.88

मालाडे 164.19

नवखार तर्फ उमटे 114.20

तळवली तर्फ उमटे 258.44

मुरुड तालुका

तळेखार 44.94

तळे 309.47

सावरोली 235.08

चोरढे 702.11

वळके 524.17

सातिर्डे 188.15

शिरगांव 170.17

येसदे 144.97

ताडगांव 282.68

आमली 225.94

श्रीवर्धन तालुका

वारळ 931.47

—

एकूण (अंदाजीत) 19,146.62