आंबा घाटात 400 फूट दरीत ट्रक कोसळला! एक ठार, तर एकाची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबा घाट प्रारंभी असणाऱ्या गायमुख ठिकाणी खोल दरीत ट्रक कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील एका अवघड वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक चारशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात एकाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर आहे.

देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चनप्पा बीजाभाय असे दरीत कोसळुन मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. तर क्लिनर जखमी झाला आहे. एपी 21 पीझेड 5227 हा बाराचाकी ट्रक आंध्रप्रदेश मधून रत्नागिरीत येत होता. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर गायमुखाच्या वरील अवघड वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यात हा ट्रक थेट चारशेफुट खोल दरीत कोसळला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच साखरपा पोलीस घटनास्थळी पोहोचले. देवरुखच्या पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन करून क्लिनरला सुखरूप काढण्यात यश आले. तर चालकाचा मृतदेह खोल दरीतून पोलिसांनी वर काढला. अतिशय खोल दरीत मृतदेह असल्याने बाहेर काढणे अतिशय अवघड होते परंतु पोलिसांनी अतिशय धाडशीपणाने तो मृतदेह आणि जखमी इसमाला बाहेर काढले.

हा अपघात सायंकाळी वाजण्याच्या 5 वाजण्याच्या सुमारास घडला.या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये साखरपा पोलीस रोहित यादव,तानाजी पाटील, संजय मारळकर, वैभव कांबळे, प्रशांत नागवेकर यांच्याबरोवरच देवरुखचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग, किशोर जोयशी, सचिन पवार, होमगार्ड फोडे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

जखमी क्लिनरला आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर चालक चनाप्पा बीजभाय असे आहे. हा मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आला. कर्नाटक येथून नातेवाईक येणार असल्याने उशिरा शवविच्छेदन करण्यात आले अपघाताचा अधिक तपास साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी करीत आहेत.