
आमदारांना प्रत्येकी 50 खोक्यांचे आमिष दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवले गेले असा गौप्यस्पह्ट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. या वर्षी 50 कोटी आणि पुढच्या वर्षी 50 कोटी अशा प्रकारचा हा सौदा होता असे दानवे म्हणाले.
अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला. भारतीय जनता पक्ष हा पैशांचे प्रलोभन दाखवून पह्डापह्डी करत असल्याची चर्चा दानवे यांच्या या आरोपानंतर पुन्हा सुरू झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या एका आमदारामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांना माफी मागावी लागते हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.
शिक्षण सम्राटांच्या तुंबडय़ा भरण्यासाठी शाळा बंद करताहेत
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या मिंधे सरकारच्या निर्णयावरही दानवे यांनी टीका केली. मूठभर शिक्षण सम्राटांच्या तुंबडय़ा भरण्यासाठी शाळांच्या खासगीकरणाचा घाट घातला गेल्याचे ते म्हणाले. या खासगीकरणामुळे सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला जाणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका
आरक्षण मिळावे ही मराठा समाजाची मागणी आहे, परंतु त्यासाठी 50 टक्क्यांची मर्यादा वाढवावी लागणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपने त्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. परंतु मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असाही आरोप दानवे यांनी केला.






























































