
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नागपूरमध्ये दाखल झालेल्या फडणवीस यांच्या स्कागतासाठी लाकलेल्या बॅनरकरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब करून फडणवीस समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर प्रथमच नागपूरमध्ये पोहचलेल्या फडणवीस यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळ ते नागपूर भाजप कार्यालय अशी ढोलताशांच्या गजरात रॅलीदेखील काढण्यात आली. यानिमित्त नागपूरच्या चौकाचौकात स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे फोटो आवर्जून लावण्यात आले होते, पण गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो मात्र वगळण्यात आला होता.
केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणल्यानंतरही उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने फडणकीस नाराज आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या अभिनंदनाच्या कार्यक्रमाकडे फडणवीस यांनी पाठ फिरवली होती. त्यावेळी अभिनंदनासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो गायब करण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती नागपूरमध्येही आज घडली.































































