
अनेक हिंदी चित्रपटांतून झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून लांब आहे. गोड चेहऱ्याची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता हिने एकापेक्षा एक चांगले चित्रपट दिले. मात्र पुढे ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून लांब गेली.
अमृता ही तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिला यश राज फिल्म या मोठ्या बॅनरचे दोन चित्रपट ऑफर झाले होते. आदित्य चोप्रा यांनी तिला निल अँड निकी व बचना ए हसीनो या चित्रपटात काम करणार का असे विचारले होते. मात्र अमृताने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. कारण या चित्रपटात अभिनेत्रीचे किसिंग सिन होते व असे सिन देणे अमृताच्या तत्त्वात बसत नव्हतं. त्यामुळे तिने आदित्यला नकार कळवला होता.
”आदित्य यांनी मला विचारले होते की मी आजही इंटिमेट सिन न देण्याबाबत ठाम आहे का? ते ऐकल्यानंतर मी थोडा विचार करत होते. त्यानंतर मी सूरज बडजात्या यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला माझ्या मनाला जे वाटतं ते करायला सांगितलं. माझ्या मॅनेजरने मला सांगितले की जर मी यशराज फिल्म्समध्ये काम केलं तर फक्त घोषणेनंतर मी कोट्यवधी रुपये कमवेन. पण शेवटी मी माझ्या तत्वांवर ठाम राहिले व मी आदित्यला नकार कळवला. मी त्याला सांगितले की मी एका सुंदर नात्यात अडकले आहे. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकांना मी न्याय देऊ शकत नाही’, असे अमृताने एका मुलाखतीत सांगितले.




























































