‘अ‍ॅनिमल’चा अभिनेत्री सलोनी बत्राला फायदा, IMDb च्या सेलिब्रिटी रँकिंगमध्ये घेतली उसळी

 

रणबीर कपूर आणि रश्मीका मानधनाची प्रमुख भूमिका असणारा अ‍ॅनिमल हा चित्रपट सध्या तुफान गाजतोय. या चित्रपटात अभिनेत्री सलोनी बत्रा हिचीही भूमिका आहे. रीत हे पात्र यात तिने साकारले आहे. या रीतची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा तिला आणखी एक फायदा झाला तो म्हणजे IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत 198 व्या स्थानावरून ती 26 व्या स्थानावर पोहोचली आहे.