सुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्मा हिची सडेतोड प्रतिक्रिया

माजी क्रिेकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर यथेच्छ शेरेबाजी सुरू आहे. IPL मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात कोहलीने अत्यंत सुमार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीवरून गावस्कर यांनी हे विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे कोहलीच्या चाहत्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून त्यांनी गावस्कर यांना समालोचकांच्या चमूतून काढावे अशी मागणी केली आहे. विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिलाही गावस्कर यांचे विधान आवडलेलं नाहीये. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून गावस्कर यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल

अनुष्काने म्हटलंय की “क्रिकेटपटूच्या खेळाबद्दल त्याच्या बायकोला जबाबदार ठरवत तुम्ही असं विधान का केलंत याचा खुलासा झाला तर बरे होईल. तुम्ही इतकी वर्षे क्रिकेटपटूंच्या खासगी जीवनाचा आदर केलात , मग तुम्हाला असं वाटतं नाही की तोच आदर मला आणि आम्हालाही मिळाला पाहिजे?”

anushka-sharma-to-gavaskar

‘मला खात्री आहे की गुरुवारी रात्रीच्या माझ्या नवऱ्याच्या प्रदर्शनाबाबत विधाने करत असताना तुमच्या मनात बरीच वाक्ये असतील, शब्द असतील. बहुधा तुमचे शब्द तेव्हाच अर्थपूर्ण होत असतील जेव्हा त्यात माझे नाव सामील होत असेल’ असे अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे.

एक मॅच, पाच रेकॉर्ड; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग आणि सचिनला मागे टाकलं

अनुष्काच्या या उत्तरानंतर ट्विटरवर #SunilGavaskar असा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये कोहलीच्या पाठीराख्यांनी गावस्कर यांना कोहली याच्या तुफानी क्षेत्ररक्षणाची झलक दाखवणारे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा ही विराट कोहली याला गोलंदाजी करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याच व्हिडीओवरून गावस्कर यांनी विराट कोहली याच्यावर टीका केली होती.

गावस्कर यांच्या विधानानंतर त्यांच्या सहसमालोचकाने ते नेमके कशाबद्दल बोलत असावेत याचा अंदाज बांधून कोणताही वाद होऊ नये यासाठी प्रयत्न केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या