अरबी समुद्रात जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न नौसेनेने उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न हिंदुस्थानी नौसेनेने हाणून पाडला आहे. नौसेनेने या अपहरणाची माहिती दिली आहे. हे माल्टाचं जहाज होतं. त्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला मात्र नौसेनेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

शनिवारी अरबी समुद्रात 18 चालक दलांचं माल्टा देशाचा ध्वज असलेलं एमव्ही रुएन नावाचं मालवाहू जहाज विहरत होतं. दरम्यान सहा अज्ञातांनी या जहाजावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, हिंदुस्थानी नौसेनेला या अपहरणाची कुणकुण लागली. तसंच, जहाजाचं अपहरण होत असल्याची माहिती एमव्ही रुएनच्या कर्मचाऱ्यांकडूनही नौसेनेला मिळाली.

ही माहिती मिळताच नौसेनेने आपलं पहाऱ्यावरचं विमान आणि संरक्षणासाठी नांगरलेली एक युद्धनौका जहाजाच्या मदतीसाठी पाठवली. इतक्या मोठ्या समुद्रावर घिरट्या घालून विमानाने जहाजाच्या ठिकाणाचा शोध घेतला. त्यानंतर युद्धनौका त्या दिशेने वळवण्यात आली. पहाऱ्यावरच्या विमानाने एमव्ही रुएनवर घिरट्या घालायला सुरुवात केली. सध्या जहाज हिंदुस्थानच्या निगराणीखाली सोमालियाच्या दिशेने प्रवास करत आहे.