जगाच्या पाठीवर – जगातील पहिला प्रेशर कुकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश गायकवाड

प्रत्येक काम जलदगतीने व्हावे म्हणून संशोधक वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यातूनच समाजाला उपयोगी पडतील असे शोध लागतात. जेवण बनविण्यासाठी खूप इंधन लागते. त्या इंधनात बचत व्हावी म्हणून शास्त्रज्ञ प्रयोग करीत होते. फ्रान्समध्ये डेनिस पेपिन नावाचा संशोधक या विषयावर प्रयोग करीत होता. त्यात त्याला 1679 मध्ये यश मिळाले. त्याने त्याचे नाव ‘पेपिन्स डायजेस्टर’ असे ठेवले.

1864 मध्ये जॉर्ज गुटब्रॉड याने असे प्रेशर कुकर बनवून विकण्यास सुरुवात केली. 1918 मध्ये स्पेनने असे कुकर बनवून विकण्यास सुरुवात केली. 1935 मध्ये एक वेगळा प्रेशर कुकर बनविण्यात आली. त्याचं विशेष म्हणजे एव्हरेस्ट शिखरावर जाणाऱयांना त्यात जेवण बनविता येईल. त्यानंतर आता जास्त वापरात असतात ते कुकर 1960 नंतर वापरात येऊ लागले. आता तर विजेवर चालणारेही प्रेशर कुकर आले आहेत.

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजविण्याचा प्रमुख फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक अन्नपदार्थ कमी इंधनात शिजतात. त्यामुळे इंधनाची तर बचत होतेच, पण वेळेचीही बचत होते.

हिंदुस्थानात हॉकिन्स, प्रेस्टिज यांनी 1959 साली एकाच वेळी प्रेशर कुकर बाजारात विक्रीसाठी आणले आणि हिंदुस्थानी लोकांचा वेळ आणि इंधन बऱयाच प्रमाणात वाचायला सुरुवात झाली.