महिला सक्षमीकरण आणि योगाचे महत्त्व

>> दिलीप देशपांडे

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थिम ’महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवण्यावर भर दिला जाईल. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी योग हे एक व्यापक साधन आहे. योगाभ्यासामुळे महिलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते. योगाभ्यासामुळे महिलांना स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यांसारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

योग दिवस 21 जूनलाच का साजरा करतात यामागे काही कारणे आहेत. 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱया वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या दिवशी दिवस मोठा, तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे काही हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे.

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनीही मोठय़ा प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थिम ’महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवण्यावर भर दिला जाईल. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी योग हे एक व्यापक साधन आहे. विविधता आणि सर्वसमावेशकता वाढवणे, बदलासाठी नेत्या, शिक्षक आणि पुरस्कर्ते म्हणून सशक्त महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमच्या शारीरिक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.

योगाचे फायदे केवळ शारीरिकच नाहीत, तर मानसिक आणि भावनिकही आहेत. योगाभ्यासामुळे महिलांना स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. योगाभ्यासामुळे महिलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणात विशेष महिलापेंद्रित योग कार्यक्रमांचे आयोजन करणे, ग्रामीण आणि शहरी भागात योग शिबिरांचे आयोजन करून महिलांना योगाचे प्रशिक्षण देणे, शासनाकडूनही ‘मुलगी शिकवा, मुलगी वाचवा’, उज्ज्वला, निर्भया, हेल्पलाइन, नारी शक्ती पुरस्कार, असे कार्यक्रम राबविण्यात येतात. आज अनेक क्षेत्रांत स्त्रियांचा वावर आहे. अनेक प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागतं. कुठे अत्याचार, लैंगिक शोषण, कामाच्या ठिकाणी भेदाभेद, अशा अनेक गोष्टी आहेत.

महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो म्हणजे महिला अजूनही सक्षम, शक्तिशाली नाहीत. हिंदू जागृती समितीच्या वतीने अनेक ठिकाणी शौर्य जागरण शिबिरे आयोजित केली जातात. तेही महत्त्वाचे आहे. सक्षमीकरणासाठी शौर्य, साहस, सहभाग महत्त्वाचा आहे.