वेब न्यूज – न्यू नोएडा 2041

सर्व सुखसोयींनी सज्ज असलेल्या अत्याधुनिक शहरात राहायला कोणाला आवडणार नाही. पाण्याची समस्या नाही, प्रदूषणाची पातळी कमी, सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मोठाले रस्ते आणि उड्डाणपूल, वाहतुकीची गर्दी बिलकूल नाही, रोजगाराच्या मुबलक संधी, सर्वोत्तम अशी शिक्षण व्यवस्था, मनोरंजनाचे उपलब्ध असलेले विविध आधुनिक पर्याय, उद्याने आणि हिरवळीला दिलेले महत्त्व अशा सर्व सोयी उपलब्ध असलेले शहर हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. उत्तर प्रदेशात आता असेच एक देशातील आधुनिक आणि हाय टेक शहर वसवले जाणार आहे. दादर आणि बुलंदशहरमधील 84 गावांना एकत्र करून त्यांच्या जमिनीवर हा उत्तर प्रदेश सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहणार आहे. चार टप्प्यांत पूर्ण होणार असलेल्या या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा 2041 साली पूर्ण होणार असल्याने या प्रकल्पाचे नाव न्यू नोएडा मास्टर प्लॅन 2041 असे ठेवण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 3,165 हेक्टर, दुसऱ्या टप्प्यात 3,798 हेक्टर, तिसऱ्या टप्प्यात 5,908 हेक्टर आणि अंतिम टप्प्यात 8,230 हेक्टर जमीन विकसित केली जाणार आहे. या शहरामध्ये सर्व आधुनिक आणि हाय टेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंटिग्रेटेड सर्व्हिलांस ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टम (ISTMS), स्मार्ट सिग्नल प्रणाली, रिअल टाइम ट्रफिक आणि क्राऊड मॅनेजमेंट अशा सुविधांचा त्यात समावेश असणार आहे. जागोजागी बसवलेल्या पॅमेऱयांच्याद्वारे वाहतुकीबरोबर समाजपंटकांवरदेखील लक्ष ठेवण्यात येणार आहे. जगभरात असलेल्या इतर अत्याधुनिक शहरांचा अभ्यास करून तिथल्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यावरणपूरक इमारती उभ्या करणे, प्रदूषणाची पातळी नियंत्रित राखणे यासोबत उद्याने आणि हिरवळीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

न्यू नोएडाच्या या भव्य प्रकल्पामुळे लाखो रोजगार उपलब्ध होणार आहेत. ही स्मार्ट सिटी देशाच्या इतर शहरांसाठी विकासाचे एक आधुनिक मॉडेल म्हणून कार्य करेल असा उत्तर प्रदेश सरकारचा विश्वास आहे.

स्पायडरमॅन