रोहन बोपण्णा आणि अभिनेत्री गुल पनागच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनचा टी-शर्ट लॉन्च

 

ASICS या जपानी स्पोर्ट्सवेअर ब्रँडने आज आशियातील सर्वात प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी खास उत्पादने लाँच केली. ब्रँड ऍथलिट रोहन बोपण्णा आणि अभिनेत्री गुल पनाग यांच्या हस्ते आज टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी अधिकृत रेस डे मर्चंडाईझचे अनावरण करण्यात आले. यात खास डिझाइन केलेले टी-शर्ट, महिला आणि पुरुषांसाठी आकर्षक आणि आरामदायी शूज यांचा समावेश आहे.

पांढऱ्या आणि काळ्या रंगातील टी-शर्टवर जपानी पद्धतीचे वर्तुळ साकारण्यात आले हे वर्तुळ एकतेचा संदेश देतात. यावर टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 असेही मराठी आणि इंग्रजीत लिहिण्यात आले असून महिला आणि पुरुष धावपटू यांचे चित्र आहेत. शूजवरही Mumbai 2024 असे लिहिण्यात आले आहे. यावेळी बोलताना ASICS इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराना यांनी रोहन बोपण्णा आणि अभिनेत्री गुल पनागचे आभार मानत खेळाडूंसाठी आरामदायी पोशाख बनवून ध्येय साध्य करण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे म्हटले.

दरम्यान, टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ही जागतिक स्थरावर गाजणारी स्पर्धा असून 21 जानेवारी 2024 रोजी ही स्पर्धा पार पडेल. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून याला सुरुवात होईल.