ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा – सानियाचा महिला दुहेरीत पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुस्थानची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. कारकीर्दीतील अखेरची ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा खेळत असलेली सानिया व तिची कझाकिस्तानची साथीदार एना डेनिलिना या आठव्या मानांकित जोडीला बिगरमानांकित जोडीकडून पराभवाचा धक्का बसला.

सानिया-डेनिलिना जोडीला बेल्जियमची एलिसन व्हॅन उइतंवेक व युक्रेनची एनहेलिना कॅलिनिना या बिगरमानांकित जोडीने 4-6, 6-4, 2-6 असे पराभूत केले. ही लढत दोन तासांपर्यंत रंगली.  सानियाचे महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले असले तरी तिचे स्पर्धेतील आव्हान अद्यापि संपुष्टात आलेले नाही. आता ती रविवारी रात्री उशिरा रोहन बोपण्णासोबत मिश्र दुहेरीच्या 16 व्या फेरीचा सामना खेळणार आहे.

इगा स्विटेकला पराभवाचा धक्का

महिला एकेरीत अव्वल मानांकित टेनिसपटू इगा स्विटेक उलटफेरचा शिकार ठरली. तिच्याबरोबरच कोका गॉफलाही दुसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली. स्विटेक हिला कझाकस्तानच्या अलिना रायबाकिना हिने 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसरीकडे अमेरिकेच्या कोको गॉफचा लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेन्को हिने 7-5, 6-3 असा पराभव केला.