आता केसगळतीवर चित्रपट येणार, आय़ुष्मान खुराना मुख्य भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

केसगळती हा देशातील बहुतांश पुरुषांसाठी भयंकर चिंतेचा विषय बनला आहे. टकलू हैवान बनू नये यासाठी पुरुष वाट्टेल ते करायला तयार असतात. त्यांच्या या ‘केस’ प्रेमामुळे कृत्रिरित्या केस उगवण्याचा दावा करणाऱ्यांचा, विगवाल्यांचा धंदा जोरात आहे. हाच धागा पकडत एक चित्रपट तयार केला जात असून यामध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. ‘दम लगा कै हैशा’ आणि शुभ मंगल सावधान चित्रपटातील त्याची नायिका भूमी पेडणेकर या चित्रपटात पुन्हा एकदा आयुष्मानसोबत दिसणार आहे. सावळ्या वर्णाच्या तरुणीची गोरं दिसण्यासाठीची धडपडही या चित्रपटात दाखवण्यात आली असून भूमी या तरुणीची भूमिका साकारत आहे.

हल्लीच्या जमान्यामध्ये बाह्यरुपाला लोकं भुलतात मात्र तो माणूस आतून कसा आहे हे कोणी पाहातच नाही हे या चित्रपटाद्वारे दाखवण्यात येणार आहे. चित्रपट हा विनोदी असला तरी त्याद्वारे प्रेक्षकांना योग्य तो संदेश देण्यात आम्ही यशस्वी होऊ असं चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांनी म्हटलं आहे. मार्च महिन्यापासून चित्रपटाचं शूटींग सुरू होणार असून सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल असं सांगितलं जात आहे.