पतंजलीमध्ये 83 जणांना कोरोनाची लागण, बाबा रामदेव यांचीही टेस्ट होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पंतजली योगपीठमध्ये 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाब रामदेव यांची कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंतजली योगपीठच्या अनेक संस्थांमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. हरिद्वारच्या पंततली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 10 एप्रिलपासून कोरोनाचे 83 रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्णांना पंतजली संस्थेतच विलगीकरण करण्यात आले आहे. वेळ पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी केली जाईल असे प्रशासनाने म्हटले आहे.