संगमेश्वर : सौरपथदिपाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या परप्रातीयांना दिला चोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीमधील अनेक लाखो रुपये खर्ची घालून बसविण्यात आलेल्या सौरपथदिपाच्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या परप्रांतीयांना तरुणांनी आज बेदम चोप दिला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर त्यांच्या प्रमुखाने शेवटी दहा बॅटऱ्यांचे 65 हजार रुपये ग्रामस्थांकडे सुपूर्द केले आहेत.

ग्रामपंचायत कुळे, बोरसुत, सोनवडे, तेर्ये आणि लोवले गावातील एकाच रात्रीत दहाहून अधिक सौर पथदिपांच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. मकरसंक्रातीच्या रात्री कुळे गावातील पाच दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या तर बोरसुत तेर्ये आणि लोवले गावातील दिव्यांच्या बॅटऱ्या सुध्दा गायब झाल्या होत्या. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने देवरुख आणि संगमेश्वर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी यावर कारवाई न केल्याने पंचक्रोशीतील तरुण एकत्र आले. त्यांनी आपला मोर्चा संगमेश्वर येथील भंगार व्यावसायिकांकडे वळवला. संगमेश्वर ग्रामिण रुग्णालयाजवळील अब्दुल नावाच्या परप्रांतीयाच्या दुकानामध्ये ग्रामस्थांना बॅटऱ्याचा साठा सापडला. तेथील कामगार आणि भंगार गोळा करणाऱ्या परप्रातीयांना तरुणांनी बेदम चोप देताच त्यांनी चोरीची कबुली दिली. शेवटी एका बॅटऱीचे सहा हजार पाचशे या प्रमाणे 65 हजार इतकी रक्कम त्यांच्या प्रमुखाने ग्रामस्थांकडे सोपवली.