चित्रपटसृष्टी हादरली! एकामागोमाग तीन अभिनेत्रींची आत्महत्या; आजही एक मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल चित्रपटसृष्टीमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. एकामागोमाग एक तीन अभिनेत्रींनी आत्महत्या केल्यामुळे चित्रपटसृष्टी शॉकमध्ये गेलीय. कोलकातामध्ये आजही एका मॉडेल आणि अभिनेत्रीचा मृतदेह आढळला आहे. मंजूषा नियोगी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. पाटुली येथील राहत्या घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या तीन दिवसात दोन, तर गेल्या 15 दिवसात तीन अभिनेत्रींनी मृत्यूला कवटाळले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी डे हिच्या आत्महत्येने याची सुरुवात झाली होती. 15 मे रोजी पल्लवी हिचा मृतदेह घरामध्ये लटकलेल्या स्थितीमध्ये आढळला होता. पल्लवीच्या कुटुंबाने तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतले होते.

त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी कोलकाताची मॉडेल आणि अभिनेत्री विदिशा डे मजुमदार हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. विदिशा हिने एक सुसाईड नोटही लिहिली होती. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असे तिने म्हटले होते. प्रियकरामुळे ती व्यथित होती, मात्र सुसाईड नोटमध्ये तिने स्वत:ला कॅन्सर असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे तिला कॅन्सर नव्हता हे देखील समोर आले आहे.

तरुण अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

ट्विस्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली विदिशा आणि आज आत्महत्या केलेली मंजुषा दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. विदिशाच्या मृत्यूमुळे मंजुषा तणावामध्ये होती असे तिच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तूर्तास पोलिसांनी मंजुषा हिचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला असून दोन्ही आत्महत्यांमध्ये काही कनेक्शन आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

खळबळजनक! वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह घरात संशयास्पद स्थितीत आढळला