
‘भारत जोडो यात्रे’त शेवटचे चार दिवस कश्मीर खोऱयात जाताना बुलेटप्रूफ कारने जा. पायी चालत गेलात तर तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो, असे मला सुरक्षा अधिकाऱयांनी सांगितले होते. परंतु महात्मा गांधींजी आणि माझ्या कुटुंबीयांचे एक तत्त्वज्ञान आहे, ‘जगायचं तर न घाबरता जगायचं.’ त्यामुळे तिरस्कार करणाऱयांना मीच माझा पांढरा टी-शर्ट लाल करण्याची संधी दिली होती. बदल दो… इस टी-शर्ट का रंग लाल कर दो, देखा जाएगा. जम्मू-कश्मीरच्या लोकांनी मला हल्ला दिला नाही, तर भरभरून प्रेम दिले आहे, अशा भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या. भाजपकडून देशात जो द्वेष पसरवला जात आहे, देशाच्या मूलभूत रचनेचा पाया मोडण्याचा प्रयत्न होतोय त्याविरुद्ध आपली ही यात्रा होती, असेही त्यांनी सांगितले.
7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून निघालेल्या राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सांगता आज कश्मीरात झाली. ऊन, वारा, पावसात 145 दिवस 4000 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही यात्रा रविवारी श्रीनगरात पोहोचली. काल ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला. आज शेर-ए-कश्मीर स्टेडियमवर सभा झाली. कडाक्याच्या थंडीत, तुफानी बर्फवृष्टी होत असतानाही मोठा जनसागर लोटला होता. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरुची शिवा यांच्यासह विविध 22 पक्षांचे नेते हजर होते. बर्फवृष्टीrमुळे विमानसेवा विस्कळीत झाली, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद झाला. त्यामुळे इतर विरोधीपक्षांचे नेते शेर-ए-काश्मिर स्टेडियमवरील सभेला हजर राहू शकले नाहीत.
बुलेटप्रूफ कारने जाण्याचा सल्ला दिला होता; पण…
‘भारत जोडो यात्रे’त शेवटचे चार दिवस तुम्ही बुलेट प्रूफ कारने जावं. पायी चाललात तर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो, असे सुरक्षा अधिकाऱयांनी मला सांगितले. पण जे माझा तिरस्कार करतात त्यांना मीच माझा पांढरा टी-शर्ट लाल करण्याची संधी दिली होती आणि मी पायीच आलो. जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले. ‘बदल दो… इस टी-शर्ट को रंग लाल कर दो, देखा जाएगा’, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.
काय म्हणाले राहुल गांधी
z भाजपची विचारधारा द्वेषाची आहे. मात्र, हिंदुस्थान हा प्रेम, आपुलकी, बंधुभाव पसरवणारा देश आहे. ‘भारत जोडो यात्रा’ काढून आम्ही ‘नफरत के बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने आये थे.’
z महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी विचारधारा मांडली आहे. त्या विचारधारेची शिकवण टीकावी म्हणून मी ‘भारत जोडो यात्रा’ काढली.
हिंसाचाराची वेदना मी अनुभवली… मोदी, शहांना ती समजणार नाही
भाषणावेळी राहुल गांधी आपल्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या आठवणीने भावूक झाले. ‘मी 14 वर्षांचा होतो. शाळेत भुगोलाचा तास सुरु होता. मुख्याध्यापकांनी बोलवले. त्यांच्या कार्यालयात पह्न आला होता. पलिकडून आवाज आला, ‘आजीला गोळ्या मारल्या… आजीला गोळ्या मारल्या.’ जेव्हा मी 21 वर्षांचा होतो. तेव्हा अमेरिकेत शिकत होतो. माझ्या वडिलांच्या मित्राचा पह्न आला. त्यांनी सांगितले, ‘ बाबा आपल्यात नाहीत.’ आमचा मोबाईल, टेलिपह्नकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. तो फक्त पह्न नाही. हिंसाचाराचे दुःख, वेदना मी अनुभवली आहे. जम्मू-काश्मीरातील तैनात असलेल्या जवानांना, पुलवामात शहीद जवानांच्या कुटुंबियांना, जम्मू-काश्मिरातील लोकांना हिंसाचाराची वेदना समजते. पण जो हिंसाचाराला चिथावणी देतात जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संघ, भाजपचे लोक पिंवा अजित डोवाल असतील त्यांना या वेदना काय असतात हे समजणार नाही, असे राहुल गांधींनी सांगितले.
…म्हणून मी टी-शर्टवर संपूर्ण यात्रेत चाललो
‘भारत जोडो यात्रे’ने खूप काही शिकवले. जनतेचे खूप प्रेम मिळाले हे सांगताना राहुल गांधी यांनी संपूर्ण यात्राकाळात फक्त टी-शर्टवर प्रवास केला. याबाबत एका प्रसंगाची माहिती दिली. ‘मी जेव्हा चालत होतो त्यावेळी थंडी वाढत होती. त्या काळात चार लहान मुलं माझ्याकडे आली. ती मुलं भीक मागत होती. मी गुडघ्यावर बसलो. त्या मुलांची गळाभेट घेतली. मुलं थंडीने आणि भुकेने व्याकूळ झाली होती. मी विचार केला, जर मुलांकडे स्वेटर्स, जॅकेट नाही तर आपणही ते घालायला नको.’




























































