
बिहारमध्ये दारूबंदी कशी प्रभावीपणे राबवता येईल यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्नशील आहेत. परंतु राज्यातील दारुबंदी मागे घ्यावी अशी मागणी भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी केली आहे. ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी मागे घ्यावी अशी मागणी आमदार बचौल यांनी केली आहे.
@NitishKumar भले शराबबंदी पर क़ायम रहे लेकिन भाजपा चाहती हैं कि इसे कृषि क़ानून की तरह वापस लिया जाये ।भाजपा विधायक हरिभूषण ठाकुर ये माँग क्यों कर रहे हैं उनकी बात सुनिए @ndtvindia @Anurag_Dwary pic.twitter.com/tCcoGyae4k
— manish (@manishndtv) November 24, 2021
राज्यातील पोलीसच दारूचा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचा आरोप अमादार बिचौल यांनी केला आहे. कृषी कायद्यामुळे 96 टक्के शेतकऱ्य़ांचा फायदा होणार होता, परंतु जनमत पाहून पंतप्रधान मोदी यांनी हे कायदे मागे घेतले. अशाच प्रकारे राज्यातील दारूबंदी मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.




























































