हिंगणघाटमधील BJP आमदार समीर कुणावार यांची पोलखोल; अवैध वाळू उपश्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

अनधिकृत वाळू उपश्याचे मोठे रॅकेट हिंगणघाट तालुक्यात सुरू असून कोट्यावधी रुपयांचा महसूल, महसूल विभागांचे प्रमुख जिल्हाधिकारी यांच्या डोळ्यापुढे चोरला जातो आहे. एवढा मोठा रेती माफियांकडून दरोडा सुरू असताना जिल्हाधिकारी कुठलीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हिंगणघाट विधानसभेतील भाजप आमदार समीर कुणावार आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा अनधिकृत वाळूचा धंदा चालवीत आहेत. मागील वर्षी हिंगणघाट येथे वाळू तस्करीविरोधात झालेल्या मोठ्या कारवाईत हे स्पष्ट झाले आहे. भाजपचा युवा मोर्चा पदाधिकारी अंकुश ठाकूर याच्या वडिलांच्या नावाने तो वाळू घाट असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. मात्र आमदाराने हे कोट्यवधी रुपयांचे कारवाईचे प्रकरण सेट केले, असे सांगितले जाते.

तालुक्यातील महसूल रक्षणाची जबाबदारी असलेले उपविभागीय अधिकारी असो की, तहसीलदार असो दोन्ही अधिकारी या सर्व रेती तस्करी प्रकरणात भागीदार असल्याचे चित्र आहे. पूर्ण काळ नोकरी करून जेवढा पगार मिळणार नाही तेवढी मलाई या असल्या अधिकाऱ्यांनी लाटली आहे. याच मलाईतील रेतीचे वजन जिल्ह्याधिकारी यांना पोहचविले जात असल्याने त्यांनी आपले डोळे धृतराष्ट्र सारखे बंद करून ठेवले असल्याचे त्यांच्याचकडून खासगीत बोलले जात आहे. कारवाई केल्याचे आकडे दाखविण्यासाठीही मोठमोठ्या रेती माफियंकडून सुपारी घेऊन ट्रॅक्टरद्वारे रेती चोरी करणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. आता ट्रॅक्टरद्वारे चोरी करणारे बंद झाल्यास हे मोठे तस्कर त्यांच्या टीप्परने सर्वत्र अनधिकृत रेती विकू शकतील, अशी व्यवस्था महसूल अधिकारी करून देत असल्याचा आरोप आहे. हिंगणघाट तालुक्यांतील सर्व डेपो चालकांकडून नदी पात्रात यांत्रिकी बोट, पोकल्यांड टाकून 24 तास रेती तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे.

रेती डेपोवर चांगल्या प्रतीची रेती मिळत नसल्याने नाईलाजाने याच माआफियांकडून रेती घ्यावी लागत आहे. पोलीस विभाग देखिल या माफियांच्या आदेशाने काम करत असल्याचे आरोप आहेत. छोट्या छोट्या ट्रॅक्टर ट्रॉलींवर कारवाई केली जात आहे. मात्र अनिधिकृत रेती भरलेल्या टीप्परला वाट मोकळी करून दिली जात आहे. वर्धा जिल्ह्यात पाच-पाच आयपीएस अधिकारी आहेत यातीलच एक शिकाऊ आयपीएस अधिकारी हिंगणघाट येथील पोलीस स्टेशनचा कारभार बघत आहे. आयपीएस वृष्टी जैन यांचा हा प्रोबेशन पिरेड हिंगणघाट पोलिसात सुरू आहे. या महिला अधिकाऱ्यांकडूनही हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाळू घाटांवर कारवाई केली जात नाहीये. वृष्टी जैन या प्रोफेशनमध्ये अतिशय ढीले काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी हिंगणघाट पोलिसांना लाभल्याचा आरोप आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मांडगाव येथील वाळू घाटात तसेच वना नदीवरती असलेल्या वाळू घाटात सर्रास बोट व पोकलेन लावून 24 तास अनिधिकृतं उत्खनन सुरू आहे. यामुळे पुढील काळात अशाच पद्धतीचे राजकीय वजन अधिकाऱ्यांवर असल्यास हिंगणघाट शहराची विद्रुपता महाराष्ट्र पुढे यायला वेळ लागणार नाही.