गृहनिर्माण सोसायट्यांनो, झाडांसाठी पिण्याचे पाणी वापरू नका – पालिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगरांमध्ये झाडे तसेच फांद्या पडण्याच्या घटनांना आळा बसावा म्हणून मुंबई महापालिकेने नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना आपल्या परिसरातील झाडांची योग्य निगा राखण्याचे जाहीर आवाहन केले आहे. झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधून प्रक्रिया केलेले, झाडांसाठी योग्य आणि सुरक्षित असलेले पुनर्वापरयोग्य पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या आवारातील झाडांची संख्या, त्यांची स्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.